Uncategorized

आलापल्ली येथील रवी मुप्पीडवार यांचे दुःखद निधन; डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांनी घेतली मुप्पीडवार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

आलापल्ली : अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य रवीभाऊ मुप्पीडवार यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाल्याची वार्ता समजताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मनमिळाऊ स्वभावाचे रवी मुप्पीडवार हे सर्वपरिचित होते.

या दुःखद घटनेची माहिती कार्यकर्त्यांकडून मिळताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी तात्काळ आपले सर्व नियोजित कार्यक्रम बाजूला ठेवून आलापल्ली येथे मुप्पीडवार यांच्या निवासस्थानी धाव घेतली.

यावेळी डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी मुप्पीडवार कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस करून त्यांचे सांत्वन केले. या दुःखाच्या प्रसंगात आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत,धीर धरा,असा आधार त्यांनी कुटुंबियांना दिला.तसेच दिवंगत रवी मुप्पीडवार यांच्या आत्म्यास शांती लाभो,अशी प्रार्थना त्यांनी केली.

याप्रसंगी स्थानिक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या संवेदनशीलतेमुळे डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांच्या कार्याचे पुन्हा एकदा सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close