१५ वर्षांपासून रखडलेला तुमीरकसाचा ७/१२ चा प्रश्न अखेर सुटणार ; ड्रोन सर्व्हे व पुनर्मोजणीला सुरुवात होणार
अजय कंकडालवार यांची गावात धाव, अधिकाऱ्यांना थेट फोन ; ३० नोव्हेंबरला सर्व विभागांचे अधिकारी गावात येणार

भामरागड : तालुक्यातील तुमीरकसा गावातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे.गेल्या पंधरा वर्षांपासून रखडलेला गावाचा ७/१२ ऑनलाईनचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे.महासचिव,महाराष्ट्र काँग्रेस कमिटी व माजी अध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी या प्रश्नात स्वतः लक्ष घालून तो सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
अजयभाऊ कंकडालवार यांनी तुमीरकसा गावात प्रत्यक्ष भेट देऊन गावाच्या समस्या जाणून घेतल्या.गावकऱ्यांशी भेटून त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या आणि प्रश्न सोडवण्याचा शब्द दिला.
तुमीरकसा गावातील लोकांना गेल्या पंधरा वर्षांपासून प्रयत्न करूनही गावाचा ७/१२ ऑनलाईन मिळत नव्हता.त्यामुळे गावकऱ्यांना शेतीच्या,जमिनीच्या तसेच शासकीय कामांसाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता.वारंवार कार्यालयात जाऊनही प्रश्न सुटत नव्हता.
गावकऱ्यांची ही व्यथा लक्षात घेऊन अजयभाऊ कंकडालवार यांनी स्वतः पुढाकार घेतला.गावातील लोकांना उपसंचालक,भूमिअभिलेख प्रदेश नागपूर येथे जाण्याकरिता गाडीची व्यवस्था करून दिली होती.गावकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार केला.
या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत अजयभाऊ कंकडालवार यांनी स्वतः गावात येऊन गावातील लोकांशी सविस्तर चर्चा केली.त्यानंतर त्यांनी त्वरित भूमिअभिलेख कार्यालय अहेरीचे अधिकारी मा. गुणवंत रणदिवे साहेब यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून या विषयाची माहिती घेतली.गावकऱ्यांसमोरच फोनवरून चर्चा झाल्याने गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
यावेळी रणदिवे साहेबांनी फोनद्वारे सांगितले की,दि. ३०/११/२०२६ रोजी सोमवारी मा.जिल्हाधिकारी कार्यालय,तहसील कार्यालय,उपसंरक्षक वन विभाग,भूमिअभिलेख कार्यालयाचे पदाधिकारी उपस्थित राहून गावातील लोकांशी चर्चा करून गावाचा ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्व्हे करून पुनर्मोजणीला सुरुवात करण्यात येईल.
या निर्णयामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.आता आधुनिक पद्धतीने ड्रोन सर्व्हे होणार असल्याने गावाचा प्रश्न कायमचा सुटेल,असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला.
पुनर्मोजणीच्या वेळेस काही अडचणी आल्यास मी तुमच्या पाठीशी उभा राहून मदत करू, असे ठोस आश्वासन अजयभाऊ कंकडालवार यांनी यावेळी गावकऱ्यांना दिले.तुमच्या न्याय्य हक्कासाठी मी सदैव तुमच्या सोबत आहे,असे त्यांनी ठामपणे सांगितले.त्यांच्या या शब्दांमुळे गावकऱ्यांचा विश्वास आणखी दृढ झाला.
यावेळी निलेश वेलादी माजी सरपंच ग्राम पंचायत मेडपल्ली, महारू तलांडी पेसा अध्यक्ष, बुकलु तलांडी गाव मूमिया, कार्यकर्ते दिवाकर तलांडी,दलसु आत्राम, मल्लेश तलांडी,बाबुराव तलांडी, लालू तलांडी, देशू तलांडी,नरसा आत्राम,बिच्चू तलांडी,राकेश तलांडी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुमीरकसा गावातील या प्रश्नाच्या सोडवणुकीमुळे परिसरातील इतर गावांनाही दिलासा मिळाला असून, अजयभाऊ कंकडालवार यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



