ग्रामीण भागातील युवकांमध्ये प्रचंड क्रीडा गुण – अजय कंकडालवार
डॉ.अजय कंकडालवार यांच्या हस्ते भव्य ग्रामीण कबड्डी-व्हॉलीबॉल स्पर्धेची उद्घाटन

एटापल्ली : तालुक्यातील बारसेवाडा येथील कुपारलिंगो क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित भव्य ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन सोहळ्याला गावातील आबालवृद्ध,युवक,खेळाडू आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ढोल-ताशांच्या गजरात आणि टाळ्यांच्या कडकडाटात डॉ.कंकडालवार यांचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सचिव,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी हनुमंतू मडावी व गाव पाटील लालुजी मडावी हे होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.मोतीराम मडावी (API) पोलीस स्टेशन बोलेपल्ली,रमेश वैरागडे माजी बाजार समिती संचालक,प्रज्वल नागूलवार काँग्रेस सचिव एटापल्ली,बालाजी आलाम,मधू मडावी,सम्मा मडावी,शामराव मडावी,नानेम पोई,रिनाताई कुळयेटी माजी सरपंच ग्रामपंचायत गेदा,मधुकर मडावी,बालाजी तिम्मा,मधुकर आतलामी,भिवाजी मडावी शिक्षक बारसेवडा,रैनुजी पुंगाटी शिक्षक बारसेवडा यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनानंतर खेळाडूंना मार्गदर्शन करताना डॉ.अजय कंकडालवार यांनी मनोगत व्यक्त केले.गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवकांमध्ये प्रचंड ताकद,जिद्द आणि क्रीडा गुण आहेत.फक्त त्यांना योग्य व्यासपीठ मिळण्याची गरज आहे.कुपारलिंगो क्रीडा मंडळाने ही स्पर्धा आयोजित करून युवकांना ते व्यासपीठ दिले आहे,हे खरोखरच कौतुकास्पद आहे.
कबड्डी हा आपल्या मातीतला खेळ आहे.तो आपल्याला एकी,शिस्त आणि सांघिक भावना शिकवतो.व्हॉलीबॉलसारख्या खेळातून युवकांमध्ये आत्मविश्वास वाढतो.खेळातूनच युवक व्यसनापासून दूर राहतील आणि शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम होतील.
आजचा खेळाडू उद्याचा गावाचा आदर्श नागरिक आहे.तुम्ही फक्त स्पर्धेसाठी खेळू नका,तर गावाच्या नावलौकिकासाठी खेळा.हार-जीत होतच राहील,पण खेळाडूवृत्ती कधीच सोडू नका.ग्रामीण खेळाडूंसाठी माझा पाठिंबा नेहमीच राहील.त्यांच्या भाषणाला उपस्थित खेळाडू आणि प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.
या स्पर्धेसाठी एटापल्ली तालुक्यातील तसेच परिसरातील अनेक संघांनी सहभाग नोंदवला आहे.पहिल्याच दिवसापासून कबड्डीच्या चुरशीच्या चढाओढी आणि व्हॉलीबॉलच्या जबरदस्त स्मॅशने प्रेक्षकांची मने जिंकली.गावात सणासारखे वातावरण असून,लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण स्पर्धेचा आनंद घेत आहेत.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कुपारलिंगो क्रीडा मंडळाचे सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी आणि गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. आयोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



