Uncategorized

खेळातून शिस्त,संघभावना आणि करिअर घडवा – काँग्रेस नेते अजय कंकडालवार

भामरागड : तालुक्यातील केहकापरी गावात सध्या क्रिकेटचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.यंग स्टार वॉरियर्स क्रीडा मंडळ,केहकापरी यांच्या वतीने भव्य ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.

या भव्य स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.उद्घाटन होताच मैदानावर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि संपूर्ण वातावरण क्रिकेटमय झाले.उद्घाटन सोहळ्याला केहकापरीसह आजूबाजूच्या गावातील खेळाडू, क्रीडाप्रेमी,युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित युवक आणि खेळाडूंना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.खेळासोबतच शिक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे,शिक्षणाशिवाय खरा विकास शक्य नाही,असा संदेश यावेळी देण्यात आला.युवकांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नये,शिक्षण घेतल्यानेच आयुष्यात मोठे होता येते?

क्रिकेट या खेळाकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहू नका,तर त्यातून शिस्त,संघभावना आणि करिअरची संधी शोधा,असा मोलाचा सल्ला यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी दिला.क्रिकेटमुळे खेळाडूमध्ये शिस्त येते,एकत्र खेळल्याने संघभावना वाढते आणि चांगला खेळल्यास त्यातून मोठे करिअरही घडू शकते.त्यामुळे मैदानावर शंभर टक्के द्या,पण मैदानाबाहेरही शिस्त पाळा,असे प्रतिपादन त्यांनी केले.

उद्घाटनानंतर अजयभाऊ कंकडालवार यांनी केहकापरी गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला.गावातील विविध समस्या त्यांनी जाणून घेतल्या.गावात कोणतीही अडीअडचण आल्यास मी सदैव आपल्या सोबत राहीन,असे ठोस आश्वासन त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले.त्यांच्या या शब्दांमुळे ग्रामस्थांमध्ये आनंद आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले.

या स्पर्धेसाठी पारितोषिकांची घोषणा करण्यात आल्याने स्पर्धेला आणखी रंगत आली आहे.सदर या क्रिकेट स्पर्धेसाठी डॉ.अजय कंकडालवार यांच्याकडून प्रथम पारितोषिक देण्यात येणार आहे.द्वितीय पारितोषिक यंग स्टार वॉरियर्स क्रीडा मंडळ,केहकापरी यांच्याकडून तर तृतीय पारितोषिक भामरागड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बोगामी व उपाध्यक्ष,नगरपंचायत भामरागड विष्णु मडावी यांच्याकडून देण्यात येणार आहे.

पारितोषिकांच्या घोषणेमुळे खेळाडूंमध्ये आणखी उत्साह वाढला असून,स्पर्धा चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे.या भव्य स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी यंग स्टार वॉरियर्स क्रीडा मंडळ,केहकापरीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहेत.त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

यावेळी विष्णू मडावी उपाध्यक्ष नगरपंचायत भामरागड,प्रभाकर मडावी तालुका उपाध्यक्ष काँग्रेस भामरागड,प्रवीण मोगरकर ओबीसी सेल अध्यक्ष भामरागड,दानू आत्राम,संभारू हेमला माजी ग्रा.को.स.अध्यक्ष केहकापारी,मुन्ना कुंजामी गाव पाटील,राजू वड्डे मा.नगराध्यक्ष भामरागड,करिया आत्राम उपसरपंच,सुरेश कुंजाम,सुरेंद्र कुंजामी,चिन्नू सडमेक यांच्या सह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते परिसरातील क्रीडा प्रेमी,गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close