माणुसकीचे दर्शन; राजाराम येथील जीवन अर्का यांच्या तेरवी कार्यक्रमासाठी डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत,परिसरातून कौतुक

अहेरी : अडचणीच्या काळात धावून जाणे हेच खरे नेतृत्वाचे लक्षण असते,हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी?
अहेरी तालुक्यातील राजाराम येथील जीवन अर्का रा.राजाराम यांचे नुकतेच दुःखद निधन झाले होते.त्यांच्या तेरवीचा कार्यक्रम काल आयोजित करण्यात आला होता.हे कुटुंब गरजू असल्याने या कार्यक्रमासाठी आर्थिक अडचण निर्माण झाली होती.याबाबत माजी सभापती श्री.भास्कर तलांडे व श्री.वासुदेव सिडाम यांनी दूरध्वनीवरून डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केली.
विनंतीला तात्काळ सकारात्मक प्रतिसाद
कोणताही विलंब न करता या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी जीवन अर्का यांच्या तेरवी कार्यक्रमासाठी तात्काळ आर्थिक मदत पाठवून दिली.ही मदत माजी सभापती भास्कर तलांडे व वासुदेव सिडाम यांच्या हस्ते अर्का कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आली.
कुटुंबीयांनी मानले आभार
या मदतीमुळे तेरवीचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला.यावेळी आई रसिका अर्का,दिपक अर्का,संजय अर्का व कुटुंबीयांनी तसेच गावकऱ्यांनी डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांचे मनापासून आभार व्यक्त केले.गरजू कुटुंबांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांचे राजाराम व परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक,महिला,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



