52 दिवसांनी कारागृहातून सुटका : डॉ. अजय कंकडालवार यांचे अहेरीत जंगी स्वागत

अहेरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष मा.डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांची 52 दिवसांनंतर चंद्रपूर कारागृहातून जामिनावर सुटका झाली.
एका प्रकरणात ते गेल्या 52 दिवसांपासून चंद्रपूर कारागृहात होते. काल न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्याने त्यांची सुटका झाली. ही बातमी समजताच जिल्हाभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.
डॉ. कंकडालवार यांच्या सुटकेनंतर त्यांचे अहेरी नगरीत आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी त्यांची मिरवणूक काढली. “अजयभाऊ आगे बढो” च्या घोषणांनी संपूर्ण अहेरी दुमदुमून गेली होती.
यावेळी जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच नागरिक डॉ.कंकडालवार यांच्या अहेरी येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ.कंकडालवार यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि आपल्या सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादामुळेच मला ही ताकद मिळाली.जनतेच्या सेवेसाठी मी नेहमीच तत्पर राहीन असे सांगितले.
त्यांच्या सुटकेमुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून,आगामी काळात पक्ष संघटना अधिक बळकट होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.



