Uncategorized

संकटाच्या काळात माणुसकीचे दर्शन ; गरीब कुटुंबाला कंकडालवार यांचा आधार

भामरागड : तालुक्यातील गोपणार गावातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे.येथील रहिवाशी मधुकर मालू कळंगा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या घटनेने गोपणारसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दि.४ नोव्हेंबर,बुधवारी मधुकर कळंगा यांनी शेतात फवारणीसाठी वापरले जाणारे रासायनिक औषध प्राशन केले होते.प्रकृती बिघडताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती केले.तेथे योग्य उपचार झाल्यानंतर दि.८ नोव्हेंबर,रविवारी त्यांना सुट्टी देण्यात आली होती.कुटुंबाला वाटले होते आता सर्व ठीक होईल,पण नियतीला ते मान्य नव्हते.

काल दि.२१ नोव्हेंबर,शनिवारी त्यांची प्रकृती अचानक पुन्हा बिघडली.कुटुंबीयांनी त्यांना तातडीने अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले.मात्र प्रकृती दिवसेंदिवस खूपच बिघडत असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी रेफर केले.अहेरी ते आलापल्ली दरम्यान वाटेतच त्यांची प्राणज्योत मावळली.त्यानंतर त्यांना पुन्हा अहेरी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.

कळंगा परिवार अत्यंत गरीब आहे.कुटुंबासमोर पोस्टमॉर्टमचा खर्च आणि मृतदेह गावी घेऊन जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करणे, ही मोठी अडचण उभी ठाकली होती.या घटनेची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांना मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीचा हात पुढे केला.

त्यांनी पोस्टमॉर्टमसाठी लागणारा संपूर्ण खर्च आणि मृतदेह गावी नेण्यासाठी गाडीची व्यवस्था करून दिली.त्यामुळे शोकाकुल कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.या मदतीबद्दल कळंगा परिवाराने डॉ.अजय कंकडालवार यांचे आभार मानले आहेत.संकटाच्या काळात धावून येणाऱ्या मदतीचे गावातूनही कौतुक होत आहे.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close