Uncategorized

गडचिरोली येथे अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून नवनिर्वाचित आमदार ॲड.अभिजीत वंजारी यांचा भव्य सत्कार

गडचिरोली : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक तसेच नागपूर पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार ॲड.अभिजीत वंजारी यांचा भव्य सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे बैठकीला भव्य मेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.ढोल-ताशांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात डॉ.आमदार अभिजित वंजारी व इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.

बैठकीत संघटनात्मक कार्य अधिक बळकट करणे,पक्षाच्या ध्येयधोरणांचा आणि काँग्रेसच्या विचारधारेचा प्रसार जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे,तसेच आगामी काळातील पक्षाच्या विविध कार्यक्रमांचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

जिल्हा काँग्रेस कमिटीकडून आयोजित बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी काँग्रेस पक्षाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.

काँग्रेस नेते डॉ.कंकडालवार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात,काँग्रेस हा केवळ एक राजकीय पक्ष नसून आपला परिवार असल्याचे सांगत,स्नेहबंध जपत एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.काँग्रेसची विचारधारा ही स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि न्याय यावर उभी असून ती जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापर्यंत,शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

कार्यकर्ताच पक्षाची खरी शक्ती असल्याचे नमूद करत,कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरच पक्ष उभा असतो,त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान राखून त्याला सोबत घेऊन चालले पाहिजे,असे मत त्यांनी मांडले.तसेच शेतकरी,कामगार,आदिवासी,महिला,युवक आणि वंचित घटकांच्या न्यायासाठी काँग्रेसने नेहमीच लढा दिला असून यापुढेही जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून लढण्याची तयारी ठेवावी,असे आवाहन त्यांनी केले.

मतभेद असतील तर ते घरात मिटवून बाहेर एकाच परिवारासारखे उभे राहिले पाहिजे, एकजूट असेल तर कोणतेही आव्हान अवघड नाही आणि एकत्र राहिलो तर गडचिरोलीत काँग्रेस पुन्हा अधिक ताकदीने उभी राहील,असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.त्यांच्या मनोगताला उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.

यावेळी नागपूर पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार ॲड.अभिजीत वंजारी यांचा कंकडालवार कडून शाल,श्रीफळ देऊन भव्य सत्कार व स्वागत करण्यात आला.नागपूर पदवीधर मतदारसंघात मिळालेला विजय हा केवळ एका व्यक्तीचा विजय नसून तो काँग्रेसच्या विचारधारेचा,कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि मतदारांच्या विश्वासाचा विजय असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमाला गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे प्रभारी शत्रुघ्नभाई नागामी, नवनिर्वाचित पदवीधर आमदार ॲड. अभिजीत वंजारी, आमदार रामदासजी मसराम, गडचिरोली विधानसभा प्रभारी विजय शरटकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विश्वजित कोवासे, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, काँग्रेस कमिटी प्रभारी पंकज गुड्डेवार, प्रदेश महासचिव रवींद्र दरेकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ मेश्राम, ॲड. दुष्यंत किरसान, काँग्रेस कमिटी महासचिव हनुमंत मडावी, माजी जिल्हा परिषद सदस्य यादवराव ठाकरे, माजी सभापती परसरामजी टिकले, माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील नाट, वामन सावसाकडे, कोरची तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल, देसाईगंज तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, समशेर खान पठाण, सैनु गोटा, आरिफ कनोजिया, शशिकांत गेडाम यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, विविध सेलचे अध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी सर्वांनी एकजुटीने, एकदिलाने काँग्रेस पक्षाचे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close