Uncategorized

संड्रा गावासाठी खासदार निधीतून गोटूल बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी

गावकऱ्यांची काँग्रेस नेते डॉ.कंकडालवार यांच्या मार्फतीने खासदार डॉ.किरसान यांना निवेदन

अहेरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या मार्फतीने गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांना एक महत्त्वाचे निवेदन देण्यात आले आहे.

नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या संड्रा येथील गावकऱ्यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे.गावात आदिवासी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून,गावातील आदिवासी समाजाच्या पारंपरिक रूढी,परंपरा,संस्कृती कला व सामाजिक एकोपा जपण्यासाठी गोटूलची अत्यंत आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सध्या संड्रा गावात गोटूल बांधकामासाठी आवश्यक निधी व पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आदिवासी समाजातील वृद्ध – युवतींना सांस्कृतिक कार्यक्रम,पारंपरिक नृत्य,सामाजिक बैठका व इतर समाजाच्या सांस्कृतिक विकासासाठी अडचणी येत असल्याचे गावकऱ्यांनी निवेदनातुन म्हंटले आहे.

त्यामुळे खासदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत गोटूल बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आदिवासी समाज बांधवांनी निवेदनाद्वारे केली आहे.

तरी आपण आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून संबंधित विभागामार्फत जागेची पाहणी करून आवश्यक कार्यवाही करून गोटूल बांधकाम मंजूर करून द्यावे,अशी विनंती सुद्धा गावकऱ्यांनी केली आहे.

यावेळी काँग्रेस नेते डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी आदिवासी संस्कृती जपण्यासाठी आपण खासदारांकडे योग्य ती पाठपुरावा करून गोटूल बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची गावकऱ्यांना ग्वाही दिले.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close