Uncategorized

गरीबांचा आवाज,अन्यायाविरुद्धचा एल्गार…संतोषभाऊ ताटीकोंडावार यांचा लोकमत समूहातर्फे सन्मान

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ज्वलंत समस्यांवर निर्भीडपणे आवाज उठवणारे,गरीब-गरजू जनतेच्या हक्कासाठी अहोरात्र झटणारे आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणारे एकमेव नाव म्हणजे सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ ताटीकोंडावार.

त्यांच्या या निस्वार्थ,निरपेक्ष आणि अविरत समाजसेवेची दखल घेत लोकमत समूहातर्फे गडचिरोली येथील जिल्हा कार्यालयात त्यांची स्नेहपूर्ण भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.ही भेट जरी छोटीशी असली,तरी त्यामागचा सन्मान मात्र मोठा होता.

संतोषभाऊ ताटीकोंडावार हे गडचिरोली जिल्ह्यातील एक प्रसिद्ध आणि लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केलेले सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.कोणतेही मोठे पद नाही,कोणतीही सत्ता नाही,कोणतीही अपेक्षा नाही…तरीही फक्त समाजासाठी जगणारा माणूस म्हणून त्यांची जिल्हाभर ओळख आहे.हेच त्यांच्या कार्याचे खरे यश आहे.

गरीब जनतेच्या प्रत्येक अडचणीत संतोषभाऊ सर्वात पुढे उभे असतात.संकटात सापडलेल्या माणसाला “अहो, काही घाबरू नका, मी आहे तुमच्या सोबत”असे म्हणून ते धीर देतात.हा धीर म्हणजे फक्त शब्द नसतात,तर त्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची त्यांची कृती असते.

एखादा गरीब माणूस सरकारी कार्यालयात हेलपाटे मारून थकला असेल,त्याला कोणी वाली नसेल,तेव्हा संतोषभाऊ त्याचा आवाज बनून पुढे येतात.हेच त्यांच्या कामाचे खरे ब्रीद आहे.

महामार्गाच्या कामातील अनियमितता असो,निकृष्ट कामाविरुद्ध आवाज उठवणे असो, शेतकऱ्यांच्या धान खरेदीतील समस्या असो,शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्याचा प्रश्न असो,किंवा गरिबांना लुटणाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रश्न असो…प्रत्येक वेळी संतोषभाऊंनी ठामपणे मुद्दे उचलून प्रशासनाला जाब विचारला आहे.अनेक वेळा ते एकटे लढले,पण कधीच माघार घेतली नाही.गरीबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे,हेच त्यांनी आपले जीवनध्येय मानले आहे.

त्यांच्या या लढाऊ वृत्तीमुळेच आज गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता,शेतकरी,मजूर, गरीब कुटुंबे त्यांच्याकडे आपल्या हक्काचा माणूस म्हणून पाहतात.गावागावात “आपला संतोषभाऊ आहे” हा विश्वास लोकांच्या मनात घर करून आहे.

लोकमत समूहाने केलेल्या या सत्काराबद्दल सर्व स्तरातून संतोषभाऊंचे अभिनंदन होत असून,त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.अशा कार्यकर्त्यामुळेच समाजात अजूनही माणुसकी जिवंत आहे,अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close