Uncategorized

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी करून दिले शव स्वगावी पोचण्यासाठी गाडीची व्यवस्था

अहेरी : तालुक्यातील छल्लेवाडा येथील रहिवाशी जितमल लचीराम धरावत ( वय 26 वर्षे )यांची घरातील काल संध्याकाळी दरम्यान काही वाद झाल्यामुळे स्वतःच्या घरात रासायनिक औषध पिऊन आपले जीवन संपविले.त्यांचे नातेवाईकांनी तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी हलवण्यात आली होती.मात्र त्यांची अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे दुखत निधन झालं.

धरावत घरातील परिस्थिती हलाखिची असल्याची माहिती छल्लेवाडा येथील कार्यकर्त्यांनी आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांना कडळवताच तिथे उपस्थित कार्यकर्त्यांना पाठवून त्यांना शव नेण्यासाठी गाडीची व्यवस्था करून देण्यात आली.तसेच पुढील होणाऱ्या अंत्यविधी कार्यक्रमला’ही आर्थिक मदत करण्यात आली आहे.

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,प्रकाश दुर्गे,राकेश सडमेक,प्रमोद गोडसेलवारसह आविसं,काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close