१०० किमी प्रवास करून बिनागुंडात पोहोचली मदत ; अजयभाऊंच्या सेवेला सलाम

आलापल्ली : धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची जयंती फक्त हार-तुऱ्यांपुरती मर्यादित न ठेवता,प्रत्यक्ष सेवेतून साजरी करावी,या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या प्रेरणा व सहकार्याने बिनागुंडा येथे एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
१५ नोव्हेंबर रोजी आंबेडकराइट्स यूथ रिव्होल्यूशन कमिटी (AYRC) च्या कार्यकर्त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगल आणि डोंगर-दऱ्यांच्या कुशीत वसलेल्या अत्यंत दुर्गम गाव बिनागुंडा येथे भेट दिली.आलापल्लीपासून जवळपास १०० किलोमीटरचा खडतर प्रवास करून कार्यकर्ते या गावात पोहोचले.
यावेळी डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून बिनागुंडा येथील गरजू कुटुंबांना अन्नधान्य कीट व फळांचे वाटप करण्यात आले.यावेळी आदिवासी बांधवांशी संवाद साधताना डॉ. Lअजयभाऊ कंकडालवार यांच्या वतीने कार्यकर्त्यांनी त्यांचा संदेश पोहोचवला.
माझ्या आदिवासी बांधवांनो,भगवान बिरसा मुंडा यांनी जल,जंगल,जमीन यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं.त्यांचा लढा हा फक्त त्या काळापुरता नव्हता,तो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो.तुमच्या हक्कासाठी,तुमच्या जमिनीसाठी,तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी मी नेहमीच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन.कोणत्याही संकटात तुम्ही एकटे नाही,अजयभाऊ तुमच्यासोबत आहे.
आपल्या मुलांना शिकवा,त्यांना मोठं करा.शिक्षणातूनच आपल्या समाजाचा खरा विकास होणार आहे.व्यसनापासून दूर राहा,एकत्र या,संघटित व्हा,बिरसा मुंडांचा विचार हाच आपला खरा वारसा आहे.या भावनिक प्रतिपादनामुळे उपस्थित आदिवासी बांधव भारावून गेले.अनेक वृद्धांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
यावेळी गावकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधून त्यांना शिक्षणाचे महत्त्व,आरोग्याची काळजी,व्यसनमुक्ती तसेच शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.शिका,संघटित व्हा,संघर्ष करा”हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश गावकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला.
सेवा कार्यानंतर कार्यकर्त्यांनी बिनागुंडा येथील प्रसिद्ध व निसर्गरम्य धबधब्याला भेट देऊन दिवसाचा समापन केला.ही केवळ एक यात्रा नव्हती,तर समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी आणि सेवा भावनेचा एक छोटासा प्रयत्न होता,अशी भावना AYRC च्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.



