Uncategorized

महालक्ष्मी पूजेनिमित्त अहेरीत भक्तिमय वातावरण; मानकरी व्यापारी नारायणजी खांडरे यांच्या निवासस्थानी?

महालक्ष्मी दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी, कंकडालवार दाम्पत्याची उपस्थिती

अहेरी : भाद्रपद महिन्यातील महालक्ष्मी पूजेच्या पावन पर्वानिमित्त अहेरी शहरात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असताना,अहेरी येथील सुप्रसिद्ध, प्रतिष्ठित व मानकरी व्यापारी मा.नारायणजी खांडरे यांच्या निवासस्थानी आज महालक्ष्मी पूजेचा भव्य आणि मंगलमय सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिभावात संपन्न झाला.या पवित्र सोहळ्याला अहेरी व परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

आजपासून महालक्ष्मी व्रताला विधिवत प्रारंभ झाला असून,हे व्रत ३ ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे.हिंदू धर्मात महालक्ष्मी व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे.धन, धान्य आणि समृद्धीची देवता म्हणून महालक्ष्मीची पूजा केली जाते.या पार्श्वभूमीवर अहेरीतील अनेक कुटुंबांमध्ये कलश स्थापना करून महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे खांडरे कुटुंबीयांनीही आपल्या निवासस्थानी अत्यंत पारंपरिक पद्धतीने आणि शास्त्रोक्त विधीनुसार महालक्ष्मीची स्थापना केली.

यावेळी सकाळपासूनच कलश स्थापना,श्रीसूक्त पठण,महालक्ष्मी अष्टकम,कुमकुम अर्चना,नैवेद्य अर्पण आणि महाआरती असा संपूर्ण धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडला.संपूर्ण घराला आकर्षक फुलांची व विद्युत रोषणाईची सजावट करण्यात आली होती,ज्यामुळे वातावरण अधिकच प्रसन्न झाले होते.

कंकडालवार दाम्पत्याची विशेष उपस्थिती

या मंगलमय सोहळ्याला लाभलेली विशेष उपस्थिती म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आणि माजी पंचायत समिती अहेरीच्या उपसभापती सौ. सोनालीताई अजय कंकडालवार दाम्पत्याने सपत्नीक या पूजेत सहभागी होत महालक्ष्मीचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी त्यांनी मा.नारायणजी खांडरे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांना महालक्ष्मी पूजेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन केले.महालक्ष्मी मातेच्या कृपेने अहेरी तालुक्यातील प्रत्येक कुटुंबात सुख,शांती,समाधान आणि भरभराट येवो,शेतकऱ्यांच्या शेतात सुगी येवो आणि व्यापारी बांधवांच्या व्यवसायात वृद्धी होवो,अशी मनोकामना अजयभाऊ कंकडालवार यांनी यावेळी व्यक्त केली.

मा.नारायणजी खांडरे,अमोलभाऊ खांडरे व विनोदभाऊ खांडरे हे केवळ अहेरीतील आघाडीचे व्यापारी नसून,ते सामाजिक,धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यातही नेहमीच सक्रिय असतात.दरवर्षी महालक्ष्मी पूजेनिमित्त ते आपल्या निवासस्थानी सर्वांना एकत्र आणून धार्मिक व सामाजिक एकोपा जपण्याचा प्रयत्न करतात.त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या महालक्ष्मी पूजन सोहळ्याला अहेरीतील अनेक प्रतिष्ठित व्यापारी,विविध पक्षांचे पदाधिकारी,नातेवाईक,मित्र परिवार आणि मोठ्या संख्येने महिला-पुरुष भाविक उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close