कारका खुर्द येथील गोटामी कुटुंबावर दुःखाचा डोंगर; डॉ.अजय कंकडालवार यांच्याकडून तात्काळ १० हजारांची आर्थिक मदत

एटापल्ली : तालुक्यातील अतिदुर्गम कारका खुर्द येथील रहिवाशी लंकेश गोटामी यांचे वडील श्री.अडवे नेवरू गोटामी यांचे कर्करोगाने दुःखद निधन झाले. गोटामी परिवार हा अत्यंत गरीब असून,वडिलांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.अंत्यसंस्कार आणि पुढील विधीसाठी कुटुंबाला आर्थिक अडचण येत असल्याची माहिती मिळाली.
ही माहिती तालुका काँग्रेसचे नेते प्रज्वलभाऊ नागूलवार यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांना देताच,डॉ.कंकडालवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता माणुसकीचे दर्शन घडवले.
डॉ.अजय कंकडालवार यांनी तात्काळ प्रज्वलभाऊ नागूलवार यांच्यामार्फत गोटामी कुटुंबाला १०,०००/- (दहा हजार रुपये) पाठवून आर्थिक मदत केली.या मदतीमुळे शोकाकुल गोटामी कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.
काँग्रेस नेते डॉ.अजय कंकडालवार हे नेहमीच गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून येतात.या मदतीबद्दल गोटामी कुटुंबाने आणि गावकऱ्यांनी डॉ.अजय कंकडालवार यांचे मनापासून आभार मानले आहेत.
यावेळी तालुका काँग्रेस नेते प्रज्वल नागूलवार, आदिवासी काँग्रेस अध्यक्ष सुधाकर गोटा, जवेलीचे उपसरपंच दामजी हिचामी, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था सचिव स्वप्नील कनकलवार, दिनेश वड्डे, जवेलीच्या सरपंच अलिशा गोटा, दुलसा गावडे पाटील, कान्हालगाव पाटील मणिराम नरोटे, पेंदुलवाहीचे पाटील बंडू हिचामी, कोहकाचे उपसरपंच अंतू नरोटे, नेवरा मटामी, रोपीचे पाटील राकेश नरोटे, अण्णा गावडे, नेवसू नरोटे, नरेश गावडे, मंकू गोटामी, विठ्ठल गोटामी, मुरलीधर कुंभमवार, रमेश गोटामी यांच्यासह समस्त गावकरी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.



