महागाव खुर्द येथील कॅन्सरग्रस्त सुभाष मडावी यांना डॉ.अजय कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत; माणुसकीचे दर्शन

अहेरी : तालुक्यातील महागाव खुर्द येथील रहिवाशी सुभाष लक्ष्मण मडावी हे कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त असून,त्यांच्यावर वर्धा येथील सावंगी मेघे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून,उपचारासाठी मोठा खर्च येत असल्याने मडावी कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.
या कठीण प्रसंगी मडावी कुटुंबाने मदतीसाठी धाव घेतली.आज कॅन्सरग्रस्त सुभाष मडावी यांच्या पत्नी सौ.मंदा सुभाष मडावी यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अजय कंकडालवार यांच्या अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात त्यांची भेट घेऊन आपल्या पतीच्या आजाराबाबत आणि कुटुंबाच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीबाबत माहिती दिली.
सौ.मंदा मडावी यांची व्यथा ऐकून डॉ.अजय कंकडालवार यांनी तात्काळ संवेदनशीलता दाखवत माणुसकीचे दर्शन घडवले.त्यांनी कॅन्सरग्रस्त सुभाष मडावी यांच्या औषधोपचारासाठी तात्काळ आर्थिक मदत केली.
यावेळी डॉ.कंकडालवार यांनी सौ.मंदा मडावी यांना धीर देत सांगितले की,घाबरू नका, उपचारात कोणतीही अडचण येऊ देऊ नका.पुढील उपचारासाठी पैशांची किंवा कोणत्याही मदतीची आवश्यकता भासल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा,मी नेहमी मदतीसाठी तयार आहे.
डॉ.अजय कंकडालवार यांच्याकडून वेळेवर आर्थिक मदत मिळाल्याने मडावी कुटुंबाने त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
यावेळी महागाव ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास आलम,हणमंतु चेन्नूरवार,देवाजी तलांडे,सुधाकर सडमेक,शिल्पा आलम,वंदना आलम,आशा सडमेक यांच्यासह स्थानिक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मडावी कुटुंबातील नातेवाईक उपस्थित होते.



