नागपंचमी निमित्त नागदेवता मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
डॉ.अजयभाऊ कंकडालवार परिवाराकडून भाविकांना महाप्रसाद वितरण

आलापल्ली : श्रावण महिन्यातील पवित्र सण नागपंचमी आज मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली.या निमित्ताने सिरोंचा – आलापल्ली राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या सुप्रसिद्ध नागदेवता मंदिरात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
आलापल्ली शहरापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेले हे नागदेवता मंदिर परिसरातील एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते.नागपंचमीच्या दिवशी येथे आल्लापल्लीसह परिसरातील गावातील शेकडो भाविक येथे मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात.नागपंचमी निमित्त नागमाता मंदिराच्या परिसरात भाविकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या.एकंदरीत नागमाता मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होता.एकप्रकारे मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाला होता.
यावेळी डॉ.अजयभाऊ कंकडालवार आणि सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी नागदेवता मंदिरात विधिवत पूजा-अर्चना,अभिषेक करून माता नागदेवतेचे दर्शन घेतले.
दरम्यान डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्ह्यातील समस्त जनतेला सुख,शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभावे अशी प्रार्थना केली.आपल्या परंपरा आणि संस्कृती जपणाऱ्या या सणांमुळे समाजात बंधुभाव वाढतो.
यावेळी भाविक भक्तांसाठी कंकडालवार परिवाराकडून महाप्रसाद वितरण करण्यात आले.शेकडो भाविक भक्तांनी महाप्रसादाचे आस्वाद घेतले.
नागपंचमी निमित्त आयोजित महाप्रसाद कार्यक्रमाला कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव हनुमंतू मडावी यांच्या सह काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.



