Uncategorized

7 वी शिष्यवृत्ती परीक्षेत इंदारामचा डंका : अजय कंकडालवार यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथे 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान शैक्षणिक क्षेत्रातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

7 वी इयत्तेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सदर यशस्वी विद्यार्थी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इंदाराम,भगवंतराव हायस्कूल इंदाराम आणि कस्तुरबा बालिका विद्यालय इंदाराम या शाळांतील आहेत.

या परीक्षेत एकूण 7 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये 4 मुली आणि 3 मुले यांचा समावेश आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याने गावात आणि शाळांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सत्कारानंतर बोलताना डॉ.अजय कंकडालवार म्हणाले,इंदारामच्या मुलांनी शिष्यवृत्ती परीक्षेत दाखवले यश हे शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे आणि विद्यार्थ्यांच्या कष्टाचे फळ आहे.शिक्षण हेच खरे शस्त्र आहे.पुढेही तुम्ही अशीच प्रगती करून गावाचे आणि जिल्ह्याचे नाव उंच करा.आम्ही तुमच्या पाठीशी नेहमी आहोत.

कार्यक्रमाला शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक,पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

इंदाराम ग्रामपंचायतचे सरपंच वर्षाताई पेंदाम,उपसरपंच वैभव कंकडालवार,ग्रामपंचायत सदस्य गुलाबराव सोयम,मुख्याध्यापक गौकर सर,राठोड मॅडम,ग्रामपंचायत अधिकारी इंदाराम पुंगटे साहेब,दवास मॅडम,शालिनीताई कामडे,कविता सोयम,शाखीर शेख,गणेश आलम,सदाशिव दुर्गे,वसंत मेश्राम,लकमा सडमेक,श्रीनिवास कोत्तावाडलवार,यांच्या सह शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक,विध्यार्थी व समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close