इंदाराम येथील शिवमंदिर जवळ काँग्रेस नेते डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

इंदाराम : इंदाराम येथील शिवमंदिर जवळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
सकाळपासूनच इंदाराम गाव देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले होते.यावेळी काँग्रेस नेते कंकडालवार इंदाराम ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.तसेच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय व भगवंतराव विद्यालय येथील तिरंगा ध्वजारोहण कार्यक्रमालासुद्धा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
शिवमंदिर जवळ ध्वजारोहण कार्यक्रमानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ.अजय कंकडालवार म्हणाले,आज आपण 80 व्या स्वातंत्र्य वर्ष साजरा करत आहोत.स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिले.ती स्वातंत्र्य टिकवणे आणि देशाचा सर्वांगीण विकास करणे ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येक गावात भौतिक सुविधा,शिक्षण,आरोग्य आणि मूलभूत सुविधा पोहोचल्या पाहिजेत.
यावेळी काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी समस्त जनतेला 80 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. इंदाराम गावात विविध ठिकाणी पार पडलेल्या ध्वजारोहण सोहळ्याला शिक्षक वृंद,विद्यार्थी,काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते,गावातील प्रतिष्ठित नागरिक,ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य तसेच ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहण कार्यक्रमांच्या प्रत्येक ठिकाणी काँग्रेस नेते डॉ.अजय कंकडालवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व नृत्य सादर करून कार्यक्रमात भर घातली.कार्यक्रमांची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.



