गोंडपिपरी येथील “हॉटेल शिवार” च्या शुभारंभास अजय कंकडालवार दांपत्याची उपस्थिती

गोंडपिपरी : शहरात नव्याने सुरू झालेल्या हॉटेल शिवार या व्हेज-नॉनव्हेज रेस्टॉरंटच्या भव्य शुभारंभ कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार व काँग्रेसच्या नेत्या,अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ. सोनालीताई कंकडालवार यांनी सप्तनिक उपस्थिती दर्शवली.
हॉटेलच्या आयोजकांनी या भव्य शुभारंभासाठी डॉ.अजय कंकडालवार यांना विशेष निमंत्रण दिले.आयोजकाच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमाला उपस्थित राहून कंकडालवार दांपत्याने हॉटेलच्या आयोजकाला शुभेच्छा दिल्या.नव्याने सुरू होणाऱ्या या हॉटेलमुळे स्थानिकांना दर्जेदार चविष्ट जेवणाचा अनुभव मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आयोजकांनी कंकडालवार दांपत्याचा यथोचित सत्कार केला.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हनुमंतू मडावी यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते.



