Uncategorized

कमलापूर ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात साजरा झाला 80 व्या स्वातंत्र्य दिन

कमलापूर | प्रतिनिधी

कमलापूर : आज 80 वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशासह कमलापूर ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कमलापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच रजनीताताई मडावी यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली.त्यानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली व राष्ट्रगीत गायन करण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक श्री.संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दर्शवली.त्यांनी सर्व ग्रामस्थांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

ध्वजारोहणानंतर सरपंच रजनीताताई मडावी यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून देशभक्तीपर विचार मांडले.तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने गावाच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर, शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी राष्ट्रभक्ती गीतांनी व देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या रंगात रंगले होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close