Uncategorized

गुड्डीगुडम येथील जयराम सिडाम यांचे निधन : डॉ.अजय कंकडालवार यांनी कुटुंबाचे केले सांत्वन,मदतीचे दिले आश्वासन

अहेरी : तालुक्यातील गुड्डीगुडम गावातील प्रतिष्ठित नागरिक जयराम सिडाम यांचे काल दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनाची माहिती समजताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी वेळेचा विलंब न करता थेट सिडाम कुटुंबाच्या घरी भेट दिली.

यावेळी डॉ.कंकडालवार यांनी शोकाकुल कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली.त्यांनी कुटुंबियांना धीर देत सांगितले की,या दुःखाच्या प्रसंगात आपण सर्वजण आपल्या सोबत आहोत.पुढील तेरवी आणि घर चालवण्यासाठी कोणतीही अडचण भासल्यास मला थेट संपर्क करा.मी मदतीसाठी नेहमी तयार आहे.

जयराम सिडाम हे गावातील सामाजिक आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व होते.त्यांच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

या सांत्वन भेटीप्रसंगी डॉ.कंकडालवार यांच्यासोबत जगन्नाथ मडावी,समय्याजी पेंदाम,माजी सरपंच गुलाबराव सोयम,माजी जि.प. सदस्य अजय नैताम,श्रीनू राऊत यांच्यासह गावातील नागरिक,स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांनी दिवंगत आत्म्यास शांती मिळो अशी प्रार्थना केली.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close