कारागृहातून सुटताच डॉ.अजय कंकडालवार यांची सामाजिक बांधिलकी – रुग्णांना दिला दिलासा

अहेरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी कारागृहातून सुटताच दुसऱ्याच दिवशी सामाजिक सेवा सुरू केली.
एका प्रकरणात 52 दिवस चंद्रपूर कारागृहात राहिल्यानंतर काल 3 ऑगस्ट रोजी त्यांची जामिनावर सुटका झाली.सुटका होताच त्यांनी थेट जनतेमध्ये जाऊन लोकांच्या अडचणी समजून घेण्यास सुरुवात केली.
याच एक भाग म्हणून अहेरी तालुक्यातील मोदुमतूर्रा येथील रहिवासी देवाजी नामदेव आलम आणि त्यांची आई सुमन नामदेव आलम यांची अचानक तब्येत बिघडली.त्यांना तातडीने अहेरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
ही माहिती मिळताच डॉ.कंकडालवार यांनी रुग्णालयात जाऊन दोन्ही रुग्णांची आस्थेने विचारपूस केली.डॉक्टरांकडून त्यांच्या उपचाराची माहिती घेतली.
यावेळी त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना धीर देत सांगितले की, उपचारादरम्यान तुम्हाला कोणतीही अडचण आल्यास मला निःसंकोचपणे सांगा मी मदतीसाठी नेहमी तयार आहे.
डॉ.कंकडालवार यांच्या या भेटीमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.नागरिकांचे म्हणणे आहे की,गेल्या 52 दिवसांत पावसाळ्यामुळे आम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.पण या काळात एकाही लोकप्रतिनिधीने आमच्याकडे येऊन विचारपूस केली नाही.
मात्र कारागृहातून बाहेर पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी डॉ.कंकडालवार यांनी रुग्णांची भेट घेऊन दाखवून दिली की जनसेवा हेच त्यांचे खरे ध्येय आहे.
त्यांच्या या तातडीच्या भेटीने आणि दिलासादायक शब्दांनी रुग्णांच्या कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला.
यावेळी अजय कंकडालवार यांचा सोबत इंदाराम ग्रामपंचायतचे सरपंच गुलाबराव सोयाम,कार्तिक तोगम,प्रशांत गोडसेलवार,नरेश गर्गम,ओमकार जक्कोजवार, प्रमोद गोडशेलवार उपस्थित होते.



