शीतलताई-भोलूभाऊ सोमनानी : गडचिरोली जिल्ह्यातील जनतेची आधारवड
सुखदुःखात सोबत, विकासासाठी कटिबद्ध" - लोकाभिमुख कार्यशैलीमुळे जनमानसात लोकप्रिय

गडचिरोली : जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शीतलताई व भोलूभाऊ सोमनानी यांची ओळख आता जनतेची आधारवड म्हणून झाली आहे.गरिबांची मदत,सामाजिक बांधिलकी आणि जिल्ह्याच्या विकासासाठी असलेली त्यांची तळमळ यामुळे ते सामान्य जनतेच्या हृदयाच्या जवळ पोहोचले आहेत.
शीतलताई व भोलूभाऊ हे गडचिरोली जिल्ह्यातील जनतेच्या प्रत्येक सुखदुःखात खंबीरपणे उभे राहतात. एखाद्याच्या घरी आनंदाचा प्रसंग असो किंवा अडचणीचा काळ,ते आवर्जून उपस्थित राहून आधार देतात.
सेवा हेच आमचे ब्रीद ही भूमिका घेऊन ते नेहमीच गरजूंना मदतीचा हात देतात.आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना,रुग्णांना आणि विद्यार्थ्यांना ते आपल्या परीने मदत करतात.त्यांच्या दारात आलेला कोणताही व्यक्ती उपाशी किंवा निराश परत जात नाही,अशी जिल्ह्यात चर्चा आहे.
प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती
जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरच्या कार्यक्रमाला – मग ते लग्न, गृहप्रवेश,वाढदिवस किंवा इतर शुभप्रसंग असो – शीतलताई-भोलूभाऊ उपस्थित राहतात.केवळ उपस्थितीच नव्हे तर भेटवस्तू आणि आपल्या परीने आर्थिक मदत करून ते आपुलकी दाखवतात.यामुळे लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे.
गडचिरोलीचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे,असे नेहमी सांगणाऱ्या शीतलताई यांनी शिक्षण,आरोग्य,शेती आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात अनेक उपक्रम राबवले आहेत.शेतकरी व शेतमजूर कल्याणासाठी रेनकोट वाटप,आरोग्य शिबिरे,शैक्षणिक मदत अशा अनेक उपक्रमांमधून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली आहे.
भोलूभाऊ सोमनानी हे देखील त्यांच्या प्रत्येक उपक्रमात खांद्याला खांदा लावून सहकार्य करतात.त्यांच्या या एकत्रित कार्यामुळे जिल्ह्यातील जनता त्यांच्याकडे एक आशेचा किरण म्हणून पाहते.
जनतेच्या मनातील स्थान
शीतलताई – भोलूभाऊ यांची ही लोकाभिमुख कार्यशैली पाहून जिल्ह्यातील नागरिक त्यांना आमची आधारवड म्हणतात.कोणत्याही अडचणीत सोमनानी परिवार आहे,हा विश्वास आता गडचिरोलीच्या प्रत्येक घरात रुजला आहे.
त्यांच्या या निरपेक्ष सेवाभावामुळे गडचिरोली जिल्ह्यात एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.



