जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त शीतलताई सोमनानी यांच्या हार्दिक शुभेच्छा
बुद्धीचा खेळ, विचारांची चाल - विजयाचा मार्ग बुद्धिबळासोबतच

गडचिरोली : आज जागतिक बुद्धिबळ दिन निमित्त गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिद्ध समाजसेविका सौ.शीतलताई भोलूभाऊ सोमनानी यांनी जिल्ह्यातील सर्व बुद्धिबळप्रेमींना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
शीतलताई यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे,बुद्धीचा खेळ,विचारांची चाल,विजयाचा मार्ग बुद्धिबळासोबतच,बुद्धिबळ हा केवळ खेळ नसून तो विचारशक्ती,संयम,नियोजन आणि रणनीतीचा खरा संगम आहे.लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी बुद्धिबळाचा अंगीकार करावा आणि आपल्या जीवनातही विचारपूर्वक चाली खेळाव्यात, असे त्या म्हणाल्या.
जागतिक बुद्धिबळ दिनाचे औचित्य साधून शीतलताई यांनी पुढे सांगितले की,बुद्धिबळामुळे मुलांमध्ये एकाग्रता,स्मरणशक्ती आणि निर्णयक्षमता वाढते.स्पर्धात्मक युगात बुद्धिबळासारखे खेळ तरुणाईसाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
विचारांची चाल,रणनीतीची साथ,यशाची वाटचाल – बुद्धिबळ, भविष्य उज्ज्वल या संदेशासह त्यांनी सर्व खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
समाजसेवेतून प्रेरणा
गडचिरोली जिल्ह्यात शीतलताई भोलूभाऊ सोमनानी या नेहमीच शैक्षणिक,क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेत असतात.जिल्ह्यातील जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या आणि गरिबांच्या मदतीला तत्पर राहणाऱ्या शीतलताई यांच्या या शुभेच्छांमुळे जिल्ह्यातील बुद्धिबळ खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
शुभेच्छुक: सौ. शीतलताई भोलूभाऊ सोमनानी (समाजसेविका, गडचिरोली जिल्हा)



