इंदाराम येथे माजी जि.प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या निवासस्थानी गणरायाची उत्साहात प्रतिष्ठापना

इंदाराम : भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या पावन पर्वावर सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या इंदाराम येथील निवासस्थानी मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
शुभमुहूर्तावर वैदिक मंत्रोच्चारात आणि ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाची विधिवत पूजा करण्यात आली.यावेळी कंकडालवार कुटुंबियांसह नातेवाईक,मित्रपरिवार,कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.उपस्थितांच्या गणपती बाप्पा मोरया,मंगलमूर्ती मोरया”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
प्रतिष्ठापनेनंतर बाप्पाची मनोभावे आरती करण्यात आली.सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी बोलताना अजयभाऊ कंकडालवार यांनी सर्व जनतेला गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.विघ्नहर्ता गणराया सर्वांच्या जीवनातील दुःख,विघ्ने दूर करून सुख,समृद्धी आणि शांती नांदो,हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना असे त्यांनी म्हटले.
गेल्या अनेक वर्षांपासून कंकडालवार कुटुंबाकडून परंपरेनुसार गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.पुढील दहा दिवस निवासस्थानी सकाळ-संध्याकाळ आरती,भजन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांसाठी दर्शन खुले राहणार आहे.
या प्रसंगी परिसरातील ज्येष्ठ नागरिक,महिला भगिनी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



