Uncategorized

अजयभाऊ कंकडालवार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

एटापल्ली तालुक्यातील शाळा व रुग्णालयात विद्यार्थी-रुग्णांना साहित्य व फळ वाटप

एटापल्ली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय अजयभाऊ कंकडालवार यांचा वाढदिवस अहेरी मतदारसंघातील एटापल्ली तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

वाढदिवसानिमित्त दिखावा न करता शिक्षण आणि आरोग्याला प्राधान्य देत तालुक्यातील विद्यार्थी आणि रुग्णांना मदत करण्यात आली.एटापल्ली तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळा व खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिटाई व बुक,पेन,पेन्सिल आणि फळांचे वाटप करण्यात आले.

जिल्हा परिषद शाळा दोड्डी टोला, जिल्हा परिषद शाळा चंदनवाली, जिल्हा परिषद शाळा चोकेवाडा, संता चावरा इंग्लिश मीडिया स्कूल, मधर लँड स्कूल, संस्कार पब्लिक स्कूल इंग्लिश मीडिया, जिल्हा परिषद स्कूल दिंदवी, जिल्हा परिषद स्कूल वांगेझरी, जिल्हा परिषद शाळा गट्टा, नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय गट्टा, जिल्हा परिषद स्कूल हालेवारा,जिल्हा परिषद शाळा बुर्गी,जिल्हा परिषद शाळा कोंडावाई येथे हा उपक्रम राबविण्यात आला.विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.शिक्षक व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.यावेळी रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.रुग्णांच्या नातेवाईकांनी या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले.

अजयभाऊ कंकडालवार यांनी आजवर शिक्षण,आरोग्य आणि ग्रामीण विकासासाठी सातत्याने काम केले आहे.वाढदिवसासारखा दिवसही त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला.

यावेळी एटापल्ली तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते,शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यंदाचा वाढदिवस पूर्णपणे सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आल्याने तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close