डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा
अहेरी तालुक्यातील 3 शाळांतील विद्यार्थ्यांना बुक, पेन,फळ व मिटाई वाटप

अहेरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती,गोरगरीब जनतेचे कैवारी आणि युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय अजयभाऊ कंकडालवार यांचा वाढदिवस अहेरी तालुक्यात विविध सामाजिक सेवा उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त कोणताही गाजावाजा न करता शिक्षणाला प्राधान्य देत तालुक्यातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात आला.
अहेरी तालुक्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय इंदाराम,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेंकटरावपेठा आणि एकलव्य निवासी मुकबधीर विद्यालय अहेरी येथे विद्यार्थ्यांना बुक,पेन,मिटाई आणि फळांचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.शिक्षकांनी देखील या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थ्यांना समाजसेवेची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजयभाऊ कंकडालवार यांच्या सामाजिक,लोकाभिमुख आणि जनहिताच्या कार्याचा गौरव केला.त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अजयभाऊ हे नेहमीच जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होतात.वाढदिवसासारखा दिवसही ते विद्यार्थ्यांच्या सेवेत घालवतात अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.
समाजसेवेच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते,शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजयभाऊ कंकडालवार हे आजवर शिक्षण,आरोग्य आणि ग्रामीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहेत.त्यांच्या या कार्यामुळे जिल्ह्यातील जनतेत त्यांच्याविषयी विशेष आदर आहे.



