डॉ.अजय कंकडालवार यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमाने साजरा ; भामरागड ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप

भामरागड : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा.श्री.डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांचा वाढदिवस आज अत्यंत सामाजिक आणि सेवाभावी पद्धतीने साजरा करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.कोणताही गाजावाजा न करता रुग्णसेवेच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी रुग्णांच्या आरोग्याची विचारपूस करून त्यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी देखील चर्चा करण्यात आली.
या सामाजिक उपक्रमात भामरागड तालुक्यातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यामध्ये लक्ष्मीकांत बोगामी तालुकाध्यक्ष, काँग्रेस कमिटी भामरागड,विष्णू मडावी उपाध्यक्ष, नगरपंचायत भामरागड,प्रभाकर मडावी उपाध्यक्ष,काँग्रेस कमिटी भामरागड,राजू काका वड्डे माजी नगरअध्यक्ष भामरागड,प्रवीण मोगरकर अध्यक्ष ओ.बी.सी.सेल काँग्रेस कमिटी भामरागड,वामनजी उईके सामाजिक कार्यकर्ते,गुरु सिडाम यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
अजयभाऊ हे नेहमीच जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात.वाढदिवसासारखा आनंदाचा दिवसही ते रुग्णांच्या सेवेत घालवतात अशी भावना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा केल्याने परिसरात समाधानाचे वातावरण होते.



