मुलचेरा येथे काँग्रेस नेते कंकडालवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रम उत्साहात

मुलचेरा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांचा वाढदिवस आज सगळीकडे विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला.
मुलचेरा येथील काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली.यावेळी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळे आणि बिस्कीटचे वाटप करण्यात आले.
रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.तसेच त्यांना लवकर बरे होऊन घरी परतण्याच्या शुभेच्छा दिल्या.रुग्णालय प्रशासनाने या उपक्रमाचे स्वागत केले.
उपस्थितांचे म्हणणे आहे की,अजयभाऊ राजकारणासोबतच समाजकारण देखील तितक्याच ताकदीने करतात.वाढदिवस साजरा करण्यापेक्षा गरजूंना मदत करणे हेच त्यांना आवडते,अजय कंकडालवार यांनी आजवर विविध पदांवर राहून जिल्ह्याच्या विकासासाठी काम केले आहे.पदावर असताना आणि नसतानाही ते जनतेच्या संपर्कात राहतात.
प्रत्येकाच्या अडीअडचणीत ते धावून जातात,त्यामुळे जिल्ह्यात त्यांच्याबद्दल एक वेगळा विश्वास निर्माण झाला आहे.या उपक्रमामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
यावेळी मुलचेरा तालुका अध्यक्ष प्रमोद गोट्टेवार,कालिदास कुसनाके तालुका अध्यक्ष आदिवासी आघाडी मुलचेरा,डॉ.मयूर कापगते ग्रामीण रुग्णालय मुलचेरा उपाध्यक्ष अनुप नंदी जेष्ठ कार्यकर्ते कवडूजी चलावार काका,तालुका सोशल मीडिया अध्यक्ष केजिकराव आरके,देवदा ग्रामपंचायतचे सरपंच केसरी पाटील तेलामी,उपसरपंच संतोष तुमरेटी,नरेश कांदो सरपंच वेंगनूर,युवा कार्यकर्ते राकेश मरापे, जॅकी कुसनाके,प्रकाश मंडल,विकास दुर्गे माजी ग्रामपंचायत सदस्य,महेंद्र आत्राम,गुरूदास कडते,संतोष आत्राम,पत्रुजी कोडापे,सुरज मरापे,काशिनाथ मडावी,लिंगा टेकूलवार,नामदेव आत्राम,साईनाथ पानेमवर,प्रकाश आलाम,मुन्नाजी नैताम,विलास सेंडमाके,संदीप तोरे,जमनदास आलाम यांच्या सह मुलचेरा तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



