अजय कंकडालवार यांचा वाढदिवस रुग्णसेवेने साजरा
अहेरी उपजिल्हा रुग्णालयात फळे व बिस्कीट वाटप,पदाधिकारी-कार्यकर्त्यांची उपस्थिती

अहेरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांचा आज वाढदिवस असून येथील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला.
वाढदिवसानिमित्त अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना फळे व बिस्कीटचे वाटप करण्यात आले.कोणताही गाजावाजा न करता साध्या पद्धतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांशीही संवाद साधण्यात आला.
या उपक्रमात अहेरी तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.उपस्थितांनी अजयभाऊंच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
अजयभाऊ हे नेहमीच जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात.वाढदिवसासारखा आनंदाचा दिवसही ते रुग्णांच्या सेवेत घालवतात.हीच त्यांची खरी ओळख आहे,खुर्ची असो वा नसो,गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी ते अहोरात्र झटत असतात.त्यांच्याकडून आम्हाला जनसेवेची प्रेरणा मिळते अशी भावना रुग्ण व नागरिकांनी व्यक्त केली.
अजय कंकडालवार हे केवळ अहेरी उपविभागापुरते मर्यादित नसून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील जनतेचे नेते म्हणून ओळखले जातात.प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे, गरजूंना मदत करणे ही त्यांची कार्यपद्धती आहे.
रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनीही या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले.अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा केल्याने कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव हणमंतु मडावी,भास्कर तलांडे माजी सभापती पंचायत समिती अहेरी,सुनीता कुस्नाके माजी जिल्हा परिषद सदस्य,गीता चालूरकर माजी उपसभापती अहेरी,वंदना दुर्गे सरपंच महागाव,दिलीप मडावी सरपंच वांगेपल्ली,अज्जू पठाण माजी सरपंच आलापल्ली,प्रमोद आत्राम माजी सरपंच परमेली,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,कार्तिक तोगम माजी उप सरपंच मरपल्ली,गुलाब सोयाम माजी सरपंच इंदाराम,राजू दर्गे ग्रामपंचायत सदस्य महागाव,स्वप्नील मडावी,सचिन पंचार्या,सलाम शेख,नरेश गर्गम,अरफाज शेख,मदनाया पानेम यांच्या सह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



