Uncategorized

रणरागिणी राणी लक्ष्मीबाईंना विनम्र वंदन : “मेरी झांसी नहीं दूंगी” आजही प्रेरणादायी – ताटीकोंडावार

अहेरी : स्वातंत्र्य संग्रामातील रणरागिणी, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी विनम्र अभिवादन केले.

यावेळी बोलताना संतोष ताटीकोंडावार म्हणाले,राणी लक्ष्मीबाई म्हणजे स्त्री-शक्तीचे ज्वलंत उदाहरण. मेरी झांसी नहीं दूंगी’ असा सिंहगर्जना करत त्यांनी इंग्रजांविरुद्ध निकराचा लढा दिला.अल्पवयात वैधव्य आले तरी खचून न जाता त्यांनी तलवार हाती घेऊन स्वराज्यासाठी प्राणांची आहुती दिली.त्यांचे शौर्य, धैर्य आणि देशभक्ती आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.

आजच्या युवक-युवतींनी राणी लक्ष्मीबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा.अन्यायाविरुद्ध लढण्याची धमक,स्वाभिमानाने जगण्याची जिद्द आणि मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी हीच राणी लक्ष्मीबाईंना खरी आदरांजली ठरेल,असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close