Uncategorized

स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेबांना विनम्र अभिवादन : जिजाऊंचा आदर्श घ्या – ताटीकोंडावार

गडचिरोली : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या स्वराज्य जननी,आदर्श माता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते तथा जनकल्याण समाजोन्नती समितीचे जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी विनम्र अभिवादन केले.

यावेळी बोलताना संतोषभाऊ ताटीकोंडावार म्हणाले,राजमाता जिजाऊंनी केवळ शिवबांना जन्म दिला नाही,तर त्यांच्यावर स्वराज्य, स्वधर्म व स्वाभिमानाचे संस्कार करून एक आदर्श राजा घडवला.प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी न डगमगता स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी शिवबांना प्रेरणा दिली.त्यांचे त्याग,शौर्य आणि दूरदृष्टी आजही प्रत्येक मातेसाठी प्रेरणादायी आहे.

आजच्या युवकांनी आणि माता-भगिनींनी जिजाऊंच्या विचारांचा आदर्श घ्यावा.मुलांवर चांगले संस्कार करणे,अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण देणे हीच जिजाऊंना खरी आदरांजली ठरेल,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close