Uncategorized

आलापल्लीत लग्नसोहळा उत्साहात : काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार सपत्नीक उपस्थित

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील श्री.दशरथ सडमेक यांची जेष्ठ कन्या चि.सौ.कां.सपना व मुलचेरा तालुक्यातील कोठारी येथील श्री.संन्याशी कडते यांचे तृतीय चिरंजीव चि.पंकज यांचा विवाह सोहळा आलापल्ली येथील साई मंदिराजवळ,गोंड मोहल्ला,वॉर्ड क्र. 3 येथील वधूच्या मंडपात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या विवाह सोहळ्यास काँग्रेस नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार व अहेरी पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार हे दाम्पत्य उपस्थित राहिले.कंकडालवार दाम्पत्यांनी नूतन वधू-वर चि.सौ.कां. सपना व चि. पंकज यांची भेट घेऊन त्यांना भेटवस्तू दिली व भावी सुखी वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व आशीर्वाद दिले.

यावेळी डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी वधूचे वडील श्री.दशरथ सडमेक व वराचे वडील श्री.संन्याशी कडते यांचे अभिनंदन करून दोन्ही परिवारांना शुभेच्छा दिल्या.सपना व पंकज यांचा संसार आनंदाचा व भरभराटीचा होवो,अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

उत्सहात पार पडलेल्या या मंगल सोहळ्यास सडमेक व कडते परिवारातील नातेवाईक,परिसरातील प्रतिष्ठित नागरिक,राजकीय-सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.काँग्रेस नेते अजयभाऊ व सोनालीताई यांच्या उपस्थितीमुळे विवाह सोहळ्याची शोभा द्विगुणित झाली.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close