वैरागड येथे स्व.कमलाबाई दयाराम सोमनानी यांच्या चौदाव्या कार्यक्रमास डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती

आरमोरी : तालुक्यातील वैरागड येथील श्री.बलराम सोमनानी (भोलूभाऊ) यांच्या मातोश्री स्व.कमलाबाई दयाराम सोमनानी यांच्या चौदाव्या (उत्तरकार्य) कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत भावपूर्ण वातावरणात करण्यात आले.या शोकसभेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून स्व.कमलाबाईंना श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी स्व.कमलाबाई दयाराम सोमनानी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.त्यानंतर त्यांनी सोमनानी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व दुःखाच्या या प्रसंगी आपण संपूर्णपणे त्यांच्या सोबत असल्याची भावना व्यक्त केली.
स्व.कमलाबाईंनी आपल्या आयुष्यात जपलेली कुटुंबवत्सलता,सामाजिक बांधिलकी आणि संस्कारमूल्ये ही पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी डॉ.अजयभाऊंनी व्यक्त केले.उपस्थितांनी त्यांच्या कार्याची आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्वाची आठवण भावुक होऊन सांगितली व त्यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा दिला.
या प्रसंगी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार देवराव होळी,माजी आमदार पेंटा रामा तलांडे,रवींद्र वासेकर,रवींद्र ओल्लावार,नंदू नरोटे,राजगोपाल सुल्लावार,भास्कर काका,संदीप ठाकूर,खान साहेब यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,विविध क्षेत्रातील मान्यवर,नातेवाईक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांनी स्व.कमलाबाईंच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी सामूहिक प्रार्थना केली.



