गर्कपेठा येथे अजयभाऊ कंकडालवार यांच्या पुढाकाराने नवीन विद्युत जनित्र बसविले
काँग्रेस नेते डॉ.अजय कंकडालवार यांच्या तत्परतेने गावातील अंधार दूर

सिरोंचा : तालुक्यातील गर्कपेठा येथील जुना विद्युत ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याने गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण गाव अंधारात होता.पाणीपुरवठा,शेतीपंप व घरगुती विजेचा प्रश्न गंभीर झाला होता.
येथील गावकऱ्यांनी या गंभीर समस्येची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांना दिली.पावसाळ्यापूर्वी गाव अंधारात असल्याने नागरिकांचे हाल होत असल्याची व्यथा त्यांनी अजयभाऊंपुढे मांडली होती.
येथील ग्रामस्थांची अडचण समजताच काँग्रेस नेते डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी तात्काळ महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.त्यांनी अधिकाऱ्यांना गर्कपेठा गावातील परिस्थितीची जाणीव करून देत तातडीने नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्याची मागणी केली.अजयभाऊंच्या पाठपुराव्यामुळे महावितरणकडून अवघ्या 24 तासांत गावासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करून बसविण्यात आला.
नवीन ट्रान्सफॉर्मर बसविताच गावातील वीजपुरवठा सुरळीत झाला व गावकऱ्यांची अंधारातून सुटका झाली.यामुळे आनंदित झालेल्या समस्त गर्कपेठा ग्रामस्थांनी डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांचे कामाप्रति समाधान व्यक्त करून सर्वांनी त्यांचे आभार मानले.



