इंदाराम येथे गोमासे-ओंडरे परिवाराच्या विवाह स्वागत समारंभ : कंकडालवार दाम्पत्याची हजेरी

अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील श्री.शंकर गोमासे यांचे कनिष्ठ चिरंजीव श्रीकांत यांचा विवाह गडअहेरी येथील स्व.अनिल ओंडरे यांची जेष्ठ कन्या कु.अनुष्का हिच्याशी शुक्रवार,29 मे रोजी इंडियन पॅलेस फंक्शन हॉल, अहेरी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
विवाह सोहळ्यानंतर शनिवार,30 मे रोजी वराच्या घरी म्हणजेच इंदाराम येथे नववधू अनुष्का व वर श्रीकांत यांचा स्वागत समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात गोमासे व ओंडरे परिवारातील नातेवाईक,मित्रपरिवार व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
सदर स्वागत समारंभ कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार व अहेरी पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी सपत्नीक उपस्थिती दर्शवली.त्यांनी नववधू-वर श्रीकांत व अनुष्का यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या भावी वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभाशीर्वाद दिले.
यावेळी डॉ.अजयभाऊ व सौ. सोनालीताईंनी गोमासे व ओंडरे कुटुंबियांचे अभिनंदन केले.श्रीकांत व अनुष्का यांनी संसारात एकमेकांना समजून घेऊन सुखी व समृद्ध जीवन जगावे,अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व युवक वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता.



