Uncategorized

कालेश्वर येथील सरस्वती अंत्य पुष्कर सोहळ्याला डॉ. कंकडालवार यांनी सहकुटुंब केले पवित्र पुण्य पुष्कर स्नान,कालेश्वर – मुक्तेश्वर स्वामींचे घेतले दर्शन

कलेश्वर ( सिरोंचा ) त्रिवेणी संगमासाठी प्रसिद्ध असलेल्या तेलंगणातील जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्यातील कालेश्वर येथे 12 वर्षांतून एकदा येणाऱ्या पवित्र सरस्वती अंत्य पुष्कर सोहळ्यास 21 मे पासून मोठ्या भक्तिभावाने सुरुवात झाली आहे.1 जून पर्यंत चालणाऱ्या या पवित्र पुष्कर पर्वासाठी महाराष्ट्र,तेलंगणा,आंध्रप्रदेश व छत्तीसगड या चार राज्यांतील हजारो भाविक कालेश्वरात दाखल होत आहेत.

आज शनिवार, 30 मे रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी सहकुटुंब कालेश्वर येथे भेट दिली.यावेळी त्यांनी गोदावरी,प्राणहिता व सरस्वती या तीन पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमात पुण्य पुष्कर स्नान केले.त्यानंतर त्यांनी माता सरस्वती देवीचे मनोभावे दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली.

दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालेश्वर येथील सुप्रसिद्ध कालेश्वर- मुक्तेश्वर स्वामी मंदिरात डॉ. अजयभाऊंनी विधिवत पूजा-अभिषेक केला.भगवान भोलेनाथाचे दर्शन घेऊन त्यांनी संपूर्ण कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली.

दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना डॉ. अजयभाऊ कंकडालवार म्हणाले,सरस्वती अंत्य पुष्कर हे अत्यंत दुर्मिळ व पवित्र पर्व आहे.आज येथे स्नान व दर्शनाचा योग आला हे माझे भाग्य आहे.मी ईश्वरचरणी गडचिरोली जिल्ह्यातील समस्त जनतेला सुख,शांती,समाधान व समृद्धी लाभो,शेतकऱ्यांचे पिक चांगले येवो व सर्वांचे जीवन मंगलमय होवो,अशी प्रार्थना केली आहे.

21 मे ते 1 जून या कालावधीत चालणाऱ्या या अंत्य पुष्कर सोहळ्यासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश व छत्तीसगड या राज्यांतून लाखो भाविक येत आहेत.पहाटे 4 वाजल्यापासूनच त्रिवेणी संगमावर भाविकांची स्नानासाठी मोठी गर्दी होत आहे.प्रशासनाकडून भाविकांच्या सोयीसाठी घाटावर बॅरिकेट्स, पिण्याचे पाणी,वैद्यकीय पथक व सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे.

गोदावरी, प्राणहिता व गुप्त सरस्वती नदीचा संगम येथे होत असल्याने कालेश्वराला विशेष महत्त्व आहे.येथील शिवलिंगावर दोन शिवपिंड आहेत,त्यांना कालेश्वर व मुक्तेश्वर म्हणतात.येथे दर्शन घेतल्याने काशी यात्रेचे पुण्य मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.12 वर्षांनी येणारा सरस्वती पुष्कर व अंत्य पुष्कर यामुळे यंदा भाविकांची संख्या प्रचंड वाढली आहे.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close