टेकूलवार-पानेवार कुटुंबात विवाह सोहळा : डॉ.अजयभाऊंची उपस्थिती

अहेरी : तालुक्यातील येल्ला येथील श्री.लिंगय्या टेकूलवार यांची जेष्ठ कन्या कु.प्रियांका हिचा विवाह येल्ला येथीलच श्री.चंदू पानेवार यांचे द्वितीय चिरंजीव महेश यांच्याशी काल येल्ला येथील वधूच्या मंडपात पारंपरिक रितीरिवाजाने मोठ्या थाटामाटात पार पडला.
पानेवार व टेकूलवार परिवाराच्या आग्रहाच्या निमंत्रणाचा मान राखून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी या विवाह सोहळ्यास उपस्थिती दर्शवली.त्यांनी नूतन वधू-वर प्रियांका व महेश यांना भेटवस्तू देऊन वैवाहिक जीवन सुख-समृद्धीचे जावो,अशा मनःपूर्वक शुभाशीर्वाद दिले.
यावेळी डॉ.अजयभाऊंनी टेकूलवार व पानेवार परिवाराचे अभिनंदन केले.दोन्ही कुटुंब येल्ला गावातील प्रतिष्ठित व सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. या दोन कुटुंबांच्या ऋणानुबंधाने गावातील एकोपा आणखी वाढेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या मंगल प्रसंगी दोन्ही परिवारातील नातेवाईक,मित्रपरिवार,गावातील प्रतिष्ठित नागरिक व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.पारंपरिक वाद्यांच्या गजरात व वऱ्हाडी मंडळींच्या शुभेच्छांमध्ये हा विवाह सोहळा आनंदात संपन्न झाला.



