Uncategorized

वट्रा (खुर्द) येथे सुरज-कांचना विवाहबद्ध : डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती, नवदाम्पत्याला दिले शुभआशीर्वाद

अहेरी : तालुक्यातील वट्रा (खुर्द) येथे चि.सुरज व चि.सौ.कां.कांचना यांचा मंगल विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात व आनंदी वातावरणात संपन्न झाला.

या विवाह सोहळ्यास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी आवर्जून उपस्थिती लावली.त्यांनी नववधू कांचना व सुरज यांची भेट घेऊन त्यांना भेटवस्तू प्रदान केली व भावी सुखी वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभआशीर्वाद दिले.

यावेळी डॉ.अजयभाऊंनी दोन्ही परिवारातील सदस्यांचे अभिनंदन करत नवदाम्पत्याच्या भावी आयुष्यासाठी शुभकामना व्यक्त केल्या.नव्या जोडप्याने संसारात प्रेम,विश्वास व समजूतदारपणा जपावा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

या विवाह सोहळ्यास वट्रा (खुर्द) व परिसरातील नातेवाईक,मित्रपरिवार, प्रतिष्ठित नागरिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सनई-चौघड्यांच्या मंगल सुरात व पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close