Uncategorized

गडचिरोलीत काँग्रेसचा शक्तिप्रदर्शन : भव्य शेतकरी मेळावा व विश्वजित कोवासे यांचा जिल्हाध्यक्ष पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेला भव्य शेतकरी मेळावा व नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे यांचा पदग्रहण सोहळा हजारो शेतकरी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेसने जिल्ह्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विश्वजित कोवासे यांचा पदग्रहण सोहळा काल शाही थाटात संपन्न झाला.यावेळी उपस्थित वरिष्ठ नेत्यांच्या हस्ते त्यांना पदाची सूत्रे प्रदान करण्यात आली.सत्काराला उत्तर देताना कोवासे म्हणाले,पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवेन.शेतकरी,आदिवासी,युवक व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी गावागावात काँग्रेसचा झेंडा पोहोचवू.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प. अध्यक्ष डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांनी विश्वजित कोवासे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.शेतकरी मेळाव्यात सहभागी होत डॉ.अजयभाऊंनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.काँग्रेस पक्ष सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.हमीभाव, कर्जमाफी,सिंचन असे प्रश्न सोडवण्यासाठी आमचा लढा सुरूच राहील,अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

या सोहळ्याला विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते व गटनेते विजयभाऊ वडेट्टीवार,आमदार रामदास मसराम, प्रदेश सचिव कुणाल चौधरी,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव अजय चिकारा,आमदार अभिजीत वंजारी,प्रदेशाध्यक्ष आदिवासी काँग्रेस वसंतराव पुरके,माजी खासदार मारोतराव कोवासे,माजी आमदार देवराव भांडेकर यांच्यासह राज्य व जिल्हा पातळीवरील प्रमुख नेते उपस्थित होते.

कार्यक्रमाला पंकज गुडेवार, रामभाऊ मेश्राम, बंडू शनिवारे, रवींद्र दरेकर, प्रकाशभाऊ इटनकर, हनुमंत मडावी, वामनराव सावसागडे, समशेर खान पठाण, नगरसेवक राजूभाऊ राशेकर, नगरसेवक विकास प्रधान, नगरसेवक श्याम उईके यांच्यासह जिल्हाभरातील काँग्रेस पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, महिला काँग्रेस, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व हजारो शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close