Uncategorized

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांच्याकडून त्रिवार मानाचा मुजरा

गडचिरोली : स्वराज्यरक्षक,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी सोशल मीडिया माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा केला.

यावेळी संतोष ताटीकोंडावार म्हणाले,छत्रपती संभाजी महाराज हे शौर्य,त्याग आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत.औरंगजेबाच्या अमानुष छळाला न डगमगता धर्मासाठी बलिदान देणाऱ्या शंभूराजांचे जीवन प्रत्येक युवकासाठी प्रेरणादायी आहे.त्यांनी 9 भाषांवर प्रभुत्व मिळवले होते,बुधभूषण सारखा ग्रंथ लिहिला,120 लढाया लढल्या आणि एकही हरले नाहीत.अशा पराक्रमी राजाला मानाचा मुजरा.

आजच्या युवकांनी संभाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून व्यसनमुक्त राहावे,शिक्षण घ्यावे आणि देशासाठी,समाजासाठी काम करावे.धर्मवीरांचे विचार आचरणात आणणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल,असे आवाहनही ताटीकोंडावार यांनी केले.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close