Uncategorized

संपतभाऊ गोगूला यांची सोशल मीडिया तालुका अध्यक्षपदी निवड; सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

सिरोंचा : सामाजिक माध्यमामध्ये नेहमी अतिशय सक्रिय राहणारे संपतभाऊ गोगूला यांची काँग्रेस पक्षाचे सिरोंचा तालुका सोशल मीडिया अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.या निवडीमुळे तालुक्यात सर्व स्तरावरून अभिनंदनचा वर्षाव सुरु आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कडून ​संपतभाऊ गोगुला यांच्या सोशल मीडिया अध्यक्ष पदाची निवड होताच,विविध राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि त्यांच्या मित्र परिवाराने सोशल मीडिया तसेच प्रत्यक्ष भेटून त्यांचे अभिनंदन केले.

‘सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्ष संघटनेचे कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संपतभाऊ नक्कीच प्रभावी कामगिरी करतील’, असा विश्वास यावेळी अनेकांनी व्यक्त केला.

​आपल्या निवडीबद्दल संपतभाऊ गोगूला यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अजयभाऊ कंकडालवार सह जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नेत्यांचे आणि मित्रांचे आभार मानत आपल्याला दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close