Uncategorized

डॉ. अजय कंकडालवार यांनी मंगुठा गावाला प्रत्यक्ष भेट देऊन जाणून घेतल्या समस्या; तातडीने निराकरण करण्याचे दिले आश्वासन

एटापल्ली : तालुक्यातील येमली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मंगुठा गावाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांनी आज भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून गावातील प्रलंबित समस्यांचा आढावा घेतला.​गावातील चर्चेदरम्यान नागरिकांनी पिण्याचे पाणी,रस्ते,वीज,आरोग्य सेवा आणि इतर पायाभूत सुविधांबाबत भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा पाढा डॉ. कंकडालवार यांच्यासमोर वाचला.गावकऱ्यांनी मांडलेल्या गाऱ्हाण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.नागरिकांना दिले आश्वस्त:

ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर डॉ.अजय कंकडालवार यांनी सर्व समस्यांची नोंद घेतली.मंगुठा गावातील निर्माण झालेल्या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेता,संबंधित विभागांशी समन्वय साधून प्रत्येक समस्येचे लवकरात लवकर निराकरण करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

त्यांच्या या आश्वासनामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले आहे.प्रलंबित कामांना गती मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.​या भेटीदरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हनुमंतू मडावी,प्रज्वल नागूलवार काँग्रेस नेते एटापल्ली,डोलेश मडावी,महेश बिरमवार,चिन्ना वेलादी,मनेश पुंगाटी, दौलत आलाम,बाजीराव इचामी,रामा तुमरेट्टी,जमुना गावडे किशोर दुर्वा,संतोष वेलदी,परमेश वेलदी,किशोर दुर्वा सह गावातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close