इंदाराम येथे पवन आणि छाया यांचा विवाह सोहळा संपन्न ; डॉ.अजय कंकडालवार यांनी दिल्या शुभेच्छा

अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथे मनोज पानेम यांची ज्येष्ठ कन्या छाया आणि देवलमरी येथील सत्यम बोल्ले यांचे ज्येष्ठ चिरंजीव पवन यांचा शुभविवाह नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.वधूच्या राहत्या घरी, म्हणजेच इंदाराम येथील विवाह मंडपात हा सोहळा पार पडला.
या विवाह सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती.त्यांनी विवाह मंडपात पोहोचून नवदाम्पत्याला अक्षता लावून शुभाशीर्वाद दिले आणि त्यांच्या पुढील सुखी संसारासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
त्यावेळी पानेम आणि बोल्ले परिवारातील सदस्य,नातेवाईक तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अजय कंकडालवार यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्यात अधिकच उत्साह दिसून आला.दोन्ही परिवारांनी आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले.यावेळी उपसरपंच वैभव कंकडालवार,गुलाबराव सोयम,प्रशांत गोडसेलवार,शंकर पानेम,मनोज पानेम,साई गौरारप,पोचन्ना येडगाम,चिन्नू गौरारप,सुरेश गेडाम यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक व स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



