Uncategorized

बारावीच्या निकालात यश मिळविलेल्या गुणवंतांचे डॉ.अजय कंकडालवार यांच्याकडून अभिनंदन

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज बारावीचा निकाल जाहीर केला असून,या परीक्षेत यश संपादन केलेल्या गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

​याप्रसंगी डॉ.कंकडालवार यांनी म्हटले आहे की,बारावीचा टप्पा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा वळणबिंदू असतो.आजच्या निकालातून विद्यार्थ्यांनी आपल्या कष्टाचे आणि जिद्दीचे चीज केले आहे.या यशात विद्यार्थ्यांच्या परिश्रमासोबतच त्यांचे पालक आणि शिक्षकांचेही मोठे योगदान आहे.

​गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेले यश कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.जे विद्यार्थी या परीक्षेत अपयशी ठरले आहेत किंवा ज्यांना अपेक्षित गुण मिळाले नाहीत,त्यांनी खचून न जाता नव्या उमेदीने पुन्हा प्रयत्न करावेत,असा मोलाचा सल्लाही डॉ.कंकडालवार यांनी यावेळी दिला.​यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन जिल्ह्याचे व शहराचे नाव उज्ज्वल करावे,अशा शुभेच्छा डॉ.अजय कंकडालवार यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना दिल्या आहेत.

​बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!हे यश तुमच्या उज्ज्वल भविष्याची नांदी ठरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना,तुमच्या पुढील वाटचालीस उदंड शुभेच्छा!

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close