Uncategorized

काँग्रेस पक्षाचे सोशल मीडियाचे अध्यक्षपदी संपतभाऊ गोगूला यांची निवड

गडचिरोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी काल तालूका काँग्रेस पक्षाचे ब्लॉक कार्यअध्यक्ष आणि सोशल मीडिया विभागाचे ब्लॉक अध्यक्ष यांची घोषणा केली असून गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.या नियुक्त्यांमुळे जिल्ह्यात काँग्रेस संघटनात्मक बांधणीला नवे बळ मिळणार असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.जाहीर करण्यात आलेल्या यादीत अहेरी,आरमोरी,भामरागड,चामोर्शी,देसाईगंज,धानोरा,सिरोंचा,मुलचेरा, कुरखेडा, कोरची,गडचिरोली आणि एटापल्ली या ब्लॉकचा तालूका काँग्रेस कमिटी वर्किंग प्रेसिडेंट आणि सोशल मीडिया ब्लॉक अध्यक्ष यांचं समावेश आहे.संबंधित भागातील नव्या अध्यक्षांवर पक्ष संघटना मजबूत करणे,बूथस्तरावर कार्यकर्ते सक्रिय करणे तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष विस्ताराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हाभरातून अभिनंदन होत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.आगामी काळात नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष अधिक सक्षमपणे कार्य करेल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.संपत तिरुपती गोगुला यांची सोशल मीडिया विभागाचे सिरोंचा ब्लॉक अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्यावर परिसरातील कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close