इंदाराम येथील पोचम्मा देवी बोनालू कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांची उपस्थित

अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा पोचम्मा देवीची बोनालु यात्रा शेकडो भक्तजनांचा उपस्थितीत भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला.या बोनालू यात्रेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसंमवेत उपस्थिती दर्शवून पोचम्मा देवींची पूजा अर्चना करून आशीर्वाद घेतले.
यावेळी त्यांनी देवीच्या चरणी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केली.तसेच कार्यक्रमला आर्थिक मदतही करण्यात आली आहे.
या बोनलू कार्यक्रमाला इंदाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच वैभव कंकडालवार,गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे स्वीकृत सदस्य प्रशांत गोडसेलवार यांच्या सह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच समस्त गावकरी व भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



