Uncategorized

माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांनी केली कोरेत कुटुंबाची सांत्वन व आर्थिक मदत

अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील बाबुराव कोरेत यांची दुःखात निधन झाले.कोरेत परिवार अंत्यत गरीब असून अंत्यविधी कार्यक्रमातुन कसेबसे बाहेर पडले पण होणाऱ्या तेरवी कार्यक्रमला अडचण बसत होती.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.डॉ.अजय कंकडालवार यांना येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी त्या दुःखात निधनची विषय कंकडालवार यांना सांगितले होते.

काँग्रेसनेते अजय कंकडालवार यांनी मृत्यक कोरेत कुटुंबांची भेट घेऊन आस्थेने सांत्वन केले.दरम्यान कोरेत परिवाराला पुढील होणाऱ्या तेरवी कार्यक्रमला अडचण भासत असल्याची माहिती अजय कंकडालवार यांना सांगितले होते.त्यावेळी कंकडालवारांनी कोरेत कुटुंबाची अडचण बघून त्यांना तेरवी कार्यक्रमला आर्थिक मदत केले.

त्यावेळी कंकडालवार सांगितले की समोर कोणत्याही अडचण भासल्यास आपण सदैव आपल्या पाठीशी असल्याचे सांगत कोरेत कुटुंबाला मोठा धीर दिले.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,राकेश सडमेक,कालिदास आत्राम,संदीप कोरेत,श्रीनिवास मडावी,दादाराम नैताम,सिताराम आत्राम,दिवाकर आत्राम,प्रवीण कोरेत यांच्या सह स्थानिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close