Uncategorized
मोद्दूमडगू येथील गुरुडवार परिवाराच्या स्वागत समारंभाला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची उपस्थित

अहेरी : तालुक्यातील मोद्दूमडगू येथील मल्लेश गुरुडवार यांचे कनिष्ठ चिरंजीव वर – निखिल यांची तेलंगणातील कागजनगर तालुक्यात गन्नाराम येथील चिलकय्या यादगिरी यांची कनिष्ठ कन्या वधू – लक्ष्मी उर्फ मंगा यांची विवाह वधूच्या मंडपात गन्नाराम येते संपन्न झालं.
काल वराच्या राहते घरी मोद्दूमडगू येथे स्वागत समारंभ कार्यक्रम आयोजित केली आहे.सदर स्वागत समारंभ कार्यक्रमाला गुरुडवार कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक मा.श्री.डॉ.अजयभाऊ कंकडालवर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हनुमंतू मडावी यांनी उपस्थित राहून नूतन वधू वरास भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीसाठी शुभआशीर्वाद दिले.
यावेळी स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



