माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मतुआधर्म महासम्मेलन तथा हरिनाम महायज्ञ कार्यक्रमला उपस्थित

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील श्रीश्री हरिगुरुचाँद मतुआ मिशन शांती हरि मंदिर,चेकिंग नाका जवळ,बजरंग चौक सुपत मंडल यांच्या घरी आलापल्ली येथील दरवर्षी प्रमाणे यंदाही मतुआधर्म महासम्मेलन तथा हरिनाम महायज्ञ कार्यक्रम आयोजित केले आहे.
आयोजित कार्यक्रमला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा संचालक अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती मा.श्री.डॉ.अजयभाऊ कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी उपस्थित दर्शवून कार्यक्रमला मार्गदर्शन केले.
दरम्यान अजय कंकडालवार व हणमंतु मडावी यांनी मंदिरात विविध पूजा करून दर्शन घेतले.तसेच कार्यक्रमला वर्गणीही देण्यात आली.
त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील समस्त नागरिकांना सुख समृद्धी आनंदी जीवन लाभो”ही”हरिचांद स्वामी कडे दर्शन घेतांना चरणी प्रार्थना केली.
यावेळी कंकडालवार सोबत दिलीप गंजीवार,उमेश चौधरी,प्रशांत गोडसेलवार यांच्या सह समस्त नागरिक तसेच स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



